Share

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी नेहमीच माझा सन्मान केला, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात चांगलेच युद्ध पेटले आहे. शिवसेना नेमकी कोणाची? असा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट व शिवसेना यांना कागदी पुरावे सादर करण्याच्या सूचना दिले आहेत. या प्रक्रियेनंतरच निवडणूक आयोग त्यांचा निर्णय तयार करतील. असे असतानाही दुसरीकडे राष्ट्रवादीचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. सध्या हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्याची जिल्हाभरात मोठी चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असाच संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता थेट शिवसेनेच्या धनुष्यबाणावर येऊन थांबलाय. कागलातील एका कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष शिवसेने सोबत असल्याचेही सांगितले जात आहे. पण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बद्दलचे कौतुकाचे बोल नक्कीच शिवसेनेला टोचण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून काम पाहत होते. तेव्हा त्यांनी कागलबरोबरच गडहिंग्लज, मुरगूड या शहरांच्या विकासासाठी मी मागितला तेवढा निधी त्यांनी दिल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी नेहमीच माझा सन्मान केला. आज जरी त्यांच्या विरोधात असले, तरी त्यांनी कागल शहराच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत, असेही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!