Share

शिक्षणमहर्षी, मराठवाड्याचे साने गुरुजी सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन

Published On: 

उस्मानाबाद : तुळजापूरचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अणदूर (ता.तुळजापूर) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांना मराठवाड्याचे साने गुरुजी म्हणून ओळखत. ६ सप्टेंबर १९३२ साली त्यांचा जन्म झाला. बीडमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर ते मुख्याध्यापक झाले. त्यानंतर १९९० साली ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी शिक्षक प्रसारक मंडळामार्फत त्यांच्या भागात २८ शाळा नव्यानं सुरू केल्या. शिक्षण क्षेत्रात काम करता असताना त्यांना राजकारणात देखील रस होता.

१९८० साली त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी शेकापचे तत्कालिन आमदार माणिकराव खपले यांचा दणदणीत पराभव केला आणि सर्वप्रथम आमदार झाले. आमदार निधीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी गरिब मुलांसाठी वसतीगृह बांधली. तर शिक्षक आणि आमदार निधीतून मिळाणाऱ्या पैशातून त्यांनी दलित मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मधुकर चव्हाण यांच्यासोबत त्यांचे राजकीय काम सुरु होते. शासनाच्या अनेक समित्यांवरही त्यांच्या नियुक्त्या होत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा मोठा गौरवही झाला होता.

दरम्यान, महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरूजी यांच्या विचाराने ते प्रेरित होते. त्यामुळे मराठवाड्याचे साने गुरूजी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. सामाजिक कार्यासोबतच त्यांनी राजकिय चळवळीत देखील सहभाग नोंदवला होता. काँग्रेसचे ते निष्ठावंत नेते राहिले होते. त्याच्या जाण्यानं मराठवाड्याच्या राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाली आहे.

तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्षही होते. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात ते सहभागी होते. तुळजापूरला अभियांत्रिक कॉलेज उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.मराठवाड्यातला दुष्काळ असो वा राष्ट्रीय आपत्ती असो आलुरे गुरुजी आणि त्यांच्या शाळेची आपदग्रस्तांना मदत ठरलेली असे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!