Share

देवेंद्र फडणवीसांना पुन्हा कोरोनाची लागण, होम क्वारंटाईनमध्ये उपचार!

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच ट्विट करून ही माहिती दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्हि आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरु आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोना झाल्यानंतर साधारण आठ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे आवश्यक असते. आता १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. ते विविध उपक्रमात सक्रीय होते. त्यामुळे आता आणखी काही नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकतात, अशी शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांची भेटीसाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ आणि सुनील केदार यांचाही समावेश होता. फडणवीस यांना लक्षणं असल्याने त्यांनी टेस्ट केली आहे. मात्र, यामुळे आता अन्य नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!