पुणे : राज्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर राज्यातील राजकीय घडोमोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांचे या दरम्यान होणाऱ्या सभा, भेटी यांमुळे निवडणुकीला आणखी धार येणार आहे. नेत्यांकडून अनेक दावे केले जात आहेत. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जात होती. आता या वक्तव्याचा भाजपाच्या चित्रा वाघ यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
‘अकेला देवेंद्र क्या करेगा,’ अशी टीका करत महाविकास आघाडीने केले होते. यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार पलटवार केले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद असताना ‘अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणताय! आरे, एकट्यानेच तुमच्या तिघांचाही धुर काढलाय, आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय,” असा टोला चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे आयोजित महिला मेळाव्यात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलं. “राज्यसभेच्या दोन जागा तर निश्चितच येणार आहेत, मात्र तिसरी आमची जागाही निवडुन येणार आहे, असा विश्वास चित्र वाघ यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या :


