🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत विद्यमान खासदार व सिने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कॉंग्रेसचा हात धरला. मात्र आता शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या पक्षाच्या विरोधातचं प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक कॉंग्रेस नेते नाराज झाले आहेत.
कॉंग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा समजावादी पक्षाकडून लखनौमधून निवडणूक लढवत आहेत.एकीकडे पक्ष आणि दुसरीकडे पत्नी अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या शत्रुघ्न यांनी पत्नीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर नाराज आहेत. तसेच शत्रुघ्न यांनी पतीधर्मापेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य द्यावे असा सल्ला कॉंग्रेसकडून देण्यात आला आहे.
पूनम सिन्हा लखनौमधून उमेदवारी अर्ज भरताना शत्रुघ्न सिन्हा त्यांच्यासोबत होते. तसेच त्यांच्या प्रचारासाठी ते लखनौमध्ये रोड शोमध्येही सहभागी झाले होते. आता ते समाजवादी पक्षाच्या मंचावर पूनम यांच्या प्रचारासाठी आले होते. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसविरोधी प्रचार करत सपा-बसपा आघाडीसाठी मते मागितली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

