🕒 1 min read
कोरेगाव:- राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निकालानंतर शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचा पराभव झाला आहे. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. मंगळापूर, किन्हई पेठ, कटापूर, ल्हासुर्णे, देऊर या गावात सत्तांतर झाल्याने शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर…”, किरीट सोमय्या यांना धमक्यांचे फोन
- शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव
- ‘कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही’
- विराट कोहलीने आपल्या ट्विटरच्या बायोमधून हटवले भारतीय क्रिकेटपटू आणि…
- शेतकरी आंदोलन यासंबंधित सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
