Share

विराट कोहलीने आपल्या ट्विटरच्या बायोमधून हटवले भारतीय क्रिकेटपटू आणि… 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार आहे. भारतीय संघ सध्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे. त्याचे कारण विराट कोहलीची पालकत्व रजा विराटची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी महिन्यात बाळाला जन्म देईल असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असल्याने विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला.

त्यानंतर पुढील दोन कसोटींमध्ये भारतीय संघाने त्याच्या अनुपस्थितीत उत्तम कामगिरी केली. त्यानंतर अचानक विराटने आपल्या ट्विटरच्या बायोमधून भारतीय क्रिकेटपटू शब्द हटवल्याचा प्रकार घडला आहे.

स्टार जोडप अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. विराट कोहलीने सोशल मीडियावर आपल्या मुलीच्या आगमनाची मोठी बातमी शेअर करताना लिहिले होते की, ‘आविराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली आहे. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली.

आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं आहे. त्यानंतर नुकताच त्याने आपल्या ट्विटरवरील बायो म्हणजेच आपल्या बद्दल देण्यात येणारी माहिती बदलल्याची गोष्ट घडली.

त्याच्या आधीच्या बायोमध्ये ‘विराट कोहलीचे अधिकृत ट्विटर अकाऊंट, भारतीय क्रिकेटपटू, खेळाडू, कारचा चाहता, फुटबॉल आवडणारा आणि सदैव उत्साही’ असा उल्लेख होता. हे सारं विराटने आता त्याच्या बायोमधून काढून टाकलं. त्याच्या जागी विराटने नवा बायो लिहिला. त्या बायोचा थेट अनुष्का आणि त्यांच्या मुलीशी संबंध आहे. विराटने नव्या बायोमध्ये लिहिले, ‘अभिमान वाटावा असा पती आणि वडिल’!

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!