🕒 1 min read
नवी दिल्ली : शशी थरूर यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व आहे हे सर्वश्रूत आहे. इंग्रजांच्या देशात जाऊन त्यांनी त्यांच्यापेक्षाही वरचढ इंग्रजी बोलून सर्वांना तोंडात बोटे घालायला लावली. सोशल मीडियावर देखील ते इंग्रजीच्या अगाध ज्ञानाबद्दल नेहमी चर्चा करत असतात. पण आता इंग्रजी भाषा शिकविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे चांगलेच संतापले आहेत.
त्याचे झाले असे की, थरूर यांच्या याच भाषाविषयक ज्ञानाचा आधार घेत एका मोबाइल अॅप कंपनीने त्यांच्याप्रमाणे इंग्रजी आम्ही शिकवतो असा दावा केलाय. विशेष म्हणजे या कंपनीने आपल्या अॅपच्या जाहिरातीमध्ये थरूर यांचा फोटो आणि नावही वापरले आहे. मात्र यावरुन आता थरूर यांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अॅपच्या जाहिरातीचा फोटो पोस्ट केला आहे. याच ब्लॅकबोर्ड रेडिओ (बीबीआर) नावाच्या अॅपची जाहिरात दिसत आहे. या जाहिरातीमध्ये थरूर यांचा फोटोही आहे. त्यांच्याप्रमाणे उत्तम इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण आम्ही देतो असा दावा कंपनीने केलाय.
This has been drawn to my attention by many unwitting students who were misled by this app. I wish to make it clear that I have NO connection to this app &have NOT endorsed it in any way. I will take legal action to stop the misuse of my name & image for commercial purposes. pic.twitter.com/C2dZhP47dd
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 22, 2021
यावर थरूर यांनी राग व्यक्त केला आहे. ते म्हणाले, या अॅपच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी माझ्या निर्दर्शनास ही गोष्ट आणून दिलीय. माझा याअॅपशी काहीही संबंध नाहीय असं मी इथे स्पष्ट करु इच्छितो. तसेच मी या अॅपला कोणत्याही प्रकारे पाठिंबा दर्शवलेला नाही. आर्थिक फायद्यासाठी माझं नाव आणि फोटो वापरल्याप्रकरणी मी या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुर्वी बैलगाडी भरुन पुरावे होते आता पेन ड्राईव्ह भरुन झाले’, कॉंग्रेस नेत्यानी उडवली खिल्ली
- टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात ; रोहित-शिखर सलामी जोडी मैदानात
- आज अखेर जॅग्वारची इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल
- पिकविमा अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
- फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

