Share

‘शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली’

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.

शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती.

एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलेला २४ वर्षीय शरजील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता आहे. सीएए आणि एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनासाठी तो ओळखला जातो. सीएए-एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनाबाबत बोलण्यासाठी शरजीलला एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं.

दरम्यान, या वादंगावर दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत एल्गार परिषदेवर टीकास्त्र डागले आहे. ‘एल्गार वाल्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे’, असा घणाघात त्यांनी केला.

‘त्यांच्यामुळे राज्यात वातावरण बिघडत आहे. यापुढे त्यांना परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल. एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण करणारा शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली असून योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं’, असं आवाहनही राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!