🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्यामध्ये अंतिम सामना झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आयपीएल 2023 (IPL 2023) कडे वळल्या आहेत. तर, आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे. तर दुसरीकडे आयपीएलच्या मिनी ऑक्शन पूर्वी अनेक संघांमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे. अनेक संघाकडून खेळाडूंची खरेदी विक्री सुरू आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये शार्दुल ठाकूर करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व
दरम्यान, आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शन पूर्वी कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) ने शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) ला दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) कडून खरेदी केले आहे. आयपीएल 2023 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स ने ट्रेड विंडोद्वारे खेळाडूंना जोडले आहे. लॉकी फर्ग्युसन आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्यानंतर अंतिम मुदतीपूर्वी केकेआर ने शार्दुल ठाकूरच्या रूपात तिसरा ट्रेड केला आहे.
शार्दुल ठाकूर सध्या भारताच्या एक दिवसीय संघाचा भाग आहे म्हणून तो न्यूझीलंड दौऱ्यामध्ये चालून झाला आहे. शार्दुलला 2022 च्या आयपीएल लिलावामध्ये दिल्ली कॅपिटल्स ने 10.75 कोटींमध्ये विकत घेतले होते. दरम्यान शार्दुल ठाकूरने आपल्या गोलंदाजीसह फलंदाजीनेही आयपीएल मध्ये आपली पात्रता स्पष्ट केली होती. कोलकत्ता नाईट रायडर्सने विकत घेण्याआधी शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग, गुजरात टायटन्स, आणि पंजाब किंग देखील विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी दिल्ली कॅपिटल संघाला त्याला घेण्यामध्ये यश मिळाले आहे.
लॉकी फर्ग्युसन आणि रहमानउल्ला गुरबाज या जोडीला गुजरात टायटन्स कडून दुसऱ्या सर्व रोग व्यवहारात विकत घेतल्यानंतर कोलकत्ता नाईट रायडर्सनी शार्दुल ठाकूर याला विकत घेतले आहे. मंगळवारी ट्रेनिंग विंडो बंद होण्याआधी नाईट रायडर्स सर्वात सक्रिय फ्रेंचाइजी बनली आहे. ट्रेनिंग विंडो मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता बंद होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Lanke | “आव्हाडांवर ७२ तासात दोन गुन्हे दाखल” ; निलेश लंके यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
- Jayant Patil | आव्हाडांवरील आरोपांवरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, “मुद्दे नसले की गुद्द्यांवर…”
- Salaam Venky Trailer | माय-लेकाच्या कथेवर आधारित चित्रपट ‘सलाम वेंकी’चा ट्रेलर झाला रिलीज
- Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाडांना निलंबित करावं – चंद्रशेखर बावनकुळे
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला”; जयंत पाटलांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
