🕒 1 min read
Nilesh Lanke | मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. दोन दिवसांपूर्वी सिनेमागृहात हर हर महादेव या चित्रपटाच्या शोदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता त्यांच्यावर एका महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३५४ अन्वये एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Govt) टीका केली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये ३५४ चा गुन्हा दाखल आहे. चुकीच्या पद्धतीने जो गुन्हा दाखल केला. त्याचा मी निषेध व्यक्त करतो. एका सामूहिक कार्यक्रमामध्ये बाजूला व्हा, बाजूला व्हा, असे सांगतो असतो. मात्र एवढ्या गोष्टींवर जर गुन्हा दाखल होत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. माझे सरकारला सांगणे आहे की तुम्ही जो पोलीस बळाचा वापर करता. तो चुकीचा वापर आहे. एखाद्या चांगल्या कर्तुत्वान माणसाला सामाजिक टार्गेट करणे चिंताजनक आहे. वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार करत आहे,” असे निलेश लंके म्हणाले.
लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे, अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते, हे महाराष्ट्राला मारक आहे, असे अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले की, सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहाता जर कोणी कायदा हाती घेतला, चूक केली, नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कारण नसताना नवीन कायदे नियमाचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम कोणी करत असेल याकडे जनतेने जागरुकतेने पाहावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | आव्हाडांवरील आरोपांवरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, “मुद्दे नसले की गुद्द्यांवर…”
- Salaam Venky Trailer | माय-लेकाच्या कथेवर आधारित चित्रपट ‘सलाम वेंकी’चा ट्रेलर झाला रिलीज
- Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाडांना निलंबित करावं – चंद्रशेखर बावनकुळे
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला”; जयंत पाटलांनी दिली माहिती
- Sunil Shende Death | दिग्गज अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन, बॉलीवूड मध्ये पसरली शोककळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

