पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. राज्य सरकारने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मराठा समाजाकडून मोठा रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर नुकतेच राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलीय. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रथमच भाष्य केलेय.
ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणाच्या खोलात गेलो नाही, राज्य सरकारची चर्चा सुरु आहे, त्यातून मार्ग निघावा. पण नव्या पिढीमध्ये ही अस्वस्थता आहे ती दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी. जी मागणी आहे सुप्रीम कोर्टाने हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राने भूमिका घ्यायला हवी’ असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील नव्या पक्ष पक्षकार्यालयाला भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा पक्षप्रवेश देखील शरद पवार यांच्या हजेरीत पार पडला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी नेते उपस्थित होते.
पर्यायी शक्तीसाठी काँग्रेसची गरज
आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडलं. आघाडीचा चेहरा कोण असावं यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटतं सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढं ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल,’ असं शरद पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- धक्कादायक! माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक
- ‘गोपीनाथ मुंडे नसले तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय’, पंकजा मुंडेंचे आवाहन
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा


