Share

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक, तीन दिवसात दुसऱ्यांदा घेतली भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडीच्या या दोन नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर आज बुधवारी पुन्हा शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी दोघांमध्येही अर्धा तास बैठक झाली असून यामध्ये विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीत अवजड वाहनांवरील वाहतूक कर माफ अथवा कमी करणे, कोरोनामुळे आणि डिझेल महागाईमुळे अडचणीत असलेल्या वाहतूकदारांना दिलासा देणे. तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती दोन्ही पक्षांकडून देण्यात आली.

मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सीबीआय, आयटी, इडीमार्फत छापे टाकले जात आहेत. तर काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित व्यक्तींवरही छापे टाकले जात आहेत. शरद पवार यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरत त्यांच्यावर नुकताच हल्ला चढवला होता.

केंद्र सरकार राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असून, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. केंद्राने राज्यातील सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तपास यंत्रणांच्या छापेमारीवर कठोर शब्दांत टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये होत असलेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!