मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या राजकीय हालचालींमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान आता शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील एकंदरीत घडामोडी बघता ही भेट महत्त्वाची आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत शरद पवार यांनी कृषी संदर्भातील विविध मुद्यांचा आढावा घेतला. या बैठकीला शरद पवार, उपमख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भूसे, परिवहन मंत्री अनिल परब आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या भेटीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेले.
NCP chief Sharad Pawar reaches residence of Chief Minister Uddhav Thackeray after holding a meeting with party leaders including deputy CM Ajit Pawar, Minister Aditi Tatkare & Eknath Khadse in Mumbai. pic.twitter.com/JkDiMEtuEs
— ANI (@ANI) July 15, 2021
दरम्यान काँग्रेसने आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली आहेच पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसने यापूर्वी अशी आक्रमक भूमिका कधीच घेतली नव्हती. तर शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष न करता वेळीच यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- चढ्या भावात अवैध दारू विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात, फिल्मी स्टाईल पाठलाग करून केली अटक
- RBI चा मास्टरकार्डला दणका! झाली ‘ही’ मोठी कारवाई
- भाजपची तिरकी चाल; नितेश राणेंची मुंबई महापालिका निवडणूक कोअर कमिटीवर वर्णी
- असा राहिला भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा..
- ‘लवकर बरा हो चॅम्पियन!’ ; रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह आढळताचं हरभजनने व्यक्त केली चिंता


