औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंदे करणाऱ्यांवर धाड़ी टाकण्याचा सपाटाच सध्या सुरु असुन अवैध दारु विक्रेता, गुटका विक्री करणारे, मोबाईल चोर यांची कुंडलीच तयार करण्यात आली असुन रात्रगस्तीसाठी पोलिसांसह गांवोगावी ग्राम सुरक्षा पथक यांची नाकेबंदी व रात्र गस्त वाढवल्याने भुरटे चोर गळाला लागत आहे. असाच एक अवैध दारू विक्रणाऱ्याला पोलीसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत अटक केली. रघुनाथ गजानन खंडागळे वय ३० वर्ष रा. राजंणगाव ता. पैठण असे आरोपीचे नाव आहे.
स. पो. नि. माने व गोपणीय शाखेचे विष्णु गायकवाड, बीट जमादार बाळासाहेब लोणे यांनी देशी दारू नेणारा रघुनाथ खंडागळे याला ताब्यात घेत, त्याच्याकडुन देशी दारुच्या १९२ बॉटल ज्याची किंमत ११५२०रु. व दुचाकी ३५००० रु . अंदाजे . असा मुद्देमाल जप्त केला.
त्यानंतर आरोपीची चौकशी करत असताना लॉकडाऊन काळात अवैध दारू चढ्या भावात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे खंडागळे याने सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
- RBI चा मास्टरकार्डला दणका! झाली ‘ही’ मोठी कारवाई
- भाजपची तिरकी चाल; नितेश राणेंची मुंबई महापालिका निवडणूक कोअर कमिटीवर वर्णी
- असा राहिला भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा..
- ‘लवकर बरा हो चॅम्पियन!’ ; रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह आढळताचं हरभजनने व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

