Share

कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेतील; हसन मुश्रीफ यांना विश्वास

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्या दमाच्या नेत्यांना संधी देऊन कमाल करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या स्थितीवरून हसन मुश्रीफ यांनी प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, अस विधान केले आहे.

पुढे बोलताना मुश्रीफ यांनी ‘पाच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्यातील जनतेची घोर फसवणूक केली आहे. बंद पडलेल्या कंपन्या आणि उद्योगधंद्यांमुळे बेरोजगारीने तर कळसच गाठला आहे. त्यामुळे अपयश पदरी आलेले सरकारमधील हे पक्ष कितीही आमदार विकत घेऊ देत,आमदारांवर कितीही दबाव टाकू देत येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना धुळीस मिळवेल असंही मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

‘या’ कारणामुळे मुलाखतीला बबन शिंदे आणि दिलीप सोपल यांनी मारली दांडी

राष्ट्रवादी-काँग्रेसचे २४० जागांवर एकमत; मनसे, वंचितसोबत अद्याप बोलणी नाही

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!