Share

राष्ट्रवादी-काँग्रेसचे २४० जागांवर एकमत; मनसे, वंचितसोबत अद्याप बोलणी नाही

Published On: 

पुणे – राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २४० जागांवर एकमत झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. उर्वरित ४८ जागांसाठी मित्रपक्षांशी चर्चा सुरु असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. पुण्यामध्ये आज शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अद्यापही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित आघाडीशी बोलणी झाली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पवार यांनी फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीच्या कारवाईची धमकी दिली जाते आहे असाही आरोप त्यांनी केला. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडूनही सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातल्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी धमकावलं जातं आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!