Share

शरद पवार देशात निर्माण करणार तिसरी आघाडी; काँग्रेस एकाकी पडण्याचे चिन्ह

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : २०१४ मध्ये देशभरात भाजपला मोठं यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे काँग्रेससह अनेक सत्ताधारी पक्षांची सत्ता गेली आणि भाजपने सत्ता काबीज केली. यामुळे, काँग्रेसला मोठा फटका तर बसलाच, पुढे सक्षम विरोधी पक्ष म्हणून मोदी सरकारवर दडपण निर्माण करण्यास देखील काँग्रेस व इतर विरोधी पक्ष अपयशी ठरले.

यामुळेच, २०१९ मध्ये भाजपला लोकसभेत अधिक यश मिळालं. दरम्यान, आता मोदी सरकारला सक्षम विरोधक म्हणून नवा पर्याय (अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह मंच ) निर्माण करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरु केल्याचे सध्या संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगाल, केरळसह पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने केंद्रात सोबत असलेल्या पक्षांना बगल देत त्यांच्या विरोधातच दुसऱ्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी केली आहे.

यामुळे, आता काँग्रेस वगळून साऱ्या विरोधकांना एकाच मंचावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे. खुद्द शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने राजकीय गोटात खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं म्हटलं आहे.

‘तिसऱ्या आघाडीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनीही तिसरी आघाडी बनविण्यावर जोर दिला आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही तिसरी आघाडी निर्माण करण्यावर जोर दिला आहे.’ असं पवार यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे शिवसेनेने आधीच विरोधकांची मोट बांधण्याचा प्रस्ताव पवारांसमोर ठेवला आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीबाबत अद्याप रुपरेषा ठरली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. एकूणच, ही आघाडी गैर भाजप आणि गैर काँग्रेस पक्षाची असल्याने विरोधकांमध्ये देखील आता काँग्रेस एकाकी पडणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!