Share

भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी; लस मागवुनही केंद्राने लस पुरवली नाही – बॅनर्जी

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

झारग्राममधील रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून कोरोना लस मिळत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी आहे, जी देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी केंद्र सरकारला राज्यात कोरोना लस पाठविण्यास सांगितले, परंतु ही लस त्यांनी पाठविली नाही. कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तरीही केंद्र सरकार आम्हाला लस देखील विनामूल्य देत नाही,’ असे सांगत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या कि, ‘आम्ही बऱ्याच दिवसांपासून सांगत आहोत, आपल्या सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारमधील जनतेला मोफत लसीबद्दल सांगितले होते. तेथील लोकांना ही लस मिळाली का?’ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यावर देखील ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला आहे. ‘मोदींनी आपल्या भाषणात रेशन योजनेचा पुनरुच्चार केला, त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदविला आहे. तसेच, भाजपाचे नेते हॉटेलमधून जेवण आणतात आणि दलित लोकांच्या घरात जेवणाची चर्चा करतात, हा गरिबांचा अपमान आहे,’ असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींसह भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!