Share

शरद पवारांनी पंतप्रधानांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहावे, फडणविसांनी हाणला टोला

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना वाढत असताना कोणत्याच उपाययोजना करत नसून परिस्थितीला हाताळण्यात राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे, असा आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केला आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ठाकरे सरकार कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. तर शरद पवारांनी पंतप्रधानांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहावे असा टोला ही हाणला आहे.

राज्य सरकारला जाग येण्यासाठी भाजप पक्षाने पुकारले ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. तरी देखील राज्य सरकार कोणतीच उपाययोजना करत नसून केवळ भावनिक साद घालत सर्व ठीक असल्याचं आभासी चित्र उभं करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था दुसरीकडे शेतमाल पडून आहे, त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे. बारा बलुतेदारांवरही संकट, केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं.

#corona : सोशल डीस्टंन्सिंगचे नियम पाळून उच्च न्यायालयातील कामकाजास सुरवात करावी !

तसेच शरद पवार पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु आहे. सामान्य माणसाला रेशन मिळत नाही. त्याकडे ही लक्ष द्यावे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

काहीही झालं तरी शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही ! CM ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

दरम्यान कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका साखर उत्पादक शेतकऱ्यांना व साखर कारखान्यांना देखील बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकराने लक्ष घालून यासाठी विशेष उपाययोजना सुचवाव्यात असे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं होत. तर केंद्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण मुंबईऐवजी गांधीनगर, गुजरात येथे स्थापन करण्यासंबंधी नुकत्याच घेतलेल्या निर्णयाबाबत  शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!