Share

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

TV9 मराठीने एका स्थानिक चॅनेलच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

दरम्यान, खा.शरद पवार हे आज कोल्हापूरमध्ये असून त्यांनी येथे सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील जी इच्छा व्यक्त केली त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, “त्यात काय झालं? त्यांना शुभेच्छा. उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावेसे वाटेल, कोणी तसे करणार का?” असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!