मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षण, शेतकरी मदत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. तर, दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीतर्फे १२ जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे सोपवण्यात आली आहेत.
या सर्व घडामोडी सुरु असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची पार पडली आहे. त्यामुळे काही महत्वाच्या घडामोडी घडणार का? याचे अनेक अंदाज बांधले जात होते.
महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते. महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाच्या निर्णयाआधी शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरत असते. केवळ १५ मिनिटे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात बैठक पार पडली आहे. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्था सातारा तर्फे मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीस मदत दिली आहे. तब्बल २ कोटी ७५ लाख रुपये निधीचा चेक त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला. सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २,७५,९२,८२१/- इतकी रक्कम संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली.”
सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २,७५,९२,८२१/- इतकी रक्कम संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली. pic.twitter.com/gfrksyLMua
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 9, 2020
महत्वाच्या बातम्या
- जो बायडेनना शेअर बाजाराची देखील सलामी; मुंबई शेअर बाजारामध्ये सेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक
- कमला हॅरिस यांचा विजय आणि मल्लिका शेरावतच ११ वर्षांपूर्वीच्या ट्विट होतय व्हायरल…
- ‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’
- हिटमॅन रोहित शर्माच्या फॅन्ससाठी महत्वाची बातमी!, बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- ‘प्रभू श्रीरामांनी रावणाचा जसा पराभव केला, तसाच करोनाचाही पराभव होणार’ – बोरिस जॉन्सन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

