Share

हिटमॅन रोहित शर्माच्या फॅन्ससाठी महत्वाची बातमी!, बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : युएईमधील देशात आयपीएलचे १३वे सत्र पार पडत असून आता हे सत्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. कोरोनाच्या वातावरणातून आयपीएलने नवा उत्साह निर्माण केला होता. यावर्षी देखील प्ले-ऑफ गाठण्यासाठी संघांना चांगलाच सामना करावा लागला. उद्या आयपीएलचा अखेरचा सामना पार पडणार आहे.

कोरोना सुरु झाल्यापासून क्रिकेटप्रेमींना या खेळाशी विरह सहन करावा लागला होता. मात्र, आता आयपीएलनंतर बीसीसीआयने भारतीय सांगाच ऑस्ट्रेलिया दौरा घोषित करून क्रिकेटप्रेमींना आणखी एक भेट दिली होती. हा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्याआधीच टीम निवडीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा याला देखील या टीम मधून डावलण्यात आल्याने भलताच संताप व्यक्त केला जात होता. आयपीएलमधील सामन्यावेळी गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असे तर्क लावत निवड समितीने त्याच्या निवडीवर सावध भूमिका घेऊन प्रतिक्षेची भूमिका घेतली होती.

यानंतर, आयपीएलच्या अंतिम साखळी सामन्यात रोहितने पुनरागमन करून आपण फिट असल्याचं दाखवून दिलं होतं. सद्या तो आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. दरम्यान, रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जागा न मिळाल्यामुळे बीसीसीआयवर चौफेर टिका करण्यात येत होती. अखेर बीसीसीआयने रोहित शर्माच्या निवडीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघात रोहितचा समावेश करण्यात आला आहे. तर संजू सॅमसनला निवड समितीने भारताच्या एकदिवसीय संघात अतिरिक्त विकेटकीपर म्हणून सामील केलं आहे.

रोहितची कसोटीसाठी जरी निवड करण्यात आली असली तरी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींना काहीसा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!