मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून पायाच्या व्याधीने त्रस्त आहेत. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर वेगवेगळ्या चाचण्या पार पडल्या. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान राज ठाकरे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार असून त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मारुती मोरे यांनी दिली.
मा. राज ठाकरे साहेब कोरोनातून लवकर बरं व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत! #GetWellSoon@RajThackeray
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 1, 2022
दरम्यान राज ठाकरेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, “मा. राज ठाकरे साहेब कोरोनातून लवकर बरं व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत!” दरम्यान राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंना बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी”, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केला शोक
- गायक KK यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “कायम स्मरणात…”
- “गायक KK यांचं अकाली झालेलं निधन मनाला चटका लावणारं”, रोहित पवारांनी व्यक्त केला शोक
- “महाराष्ट्राचे राजकारण पवारांशिवाय पूर्णच होत नाही पण…”, प्रवीण दरेकरांचा टोला
- ‘आंखों में तेरी अजब सी…’, गाणारे प्रसिद्ध गायक KK यांचे निधन


