नवी दिल्ली: २९ मार्च रोजी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते.या बैठकीत शरद पवारांनी ( (NCP President Sharad Pawar)) संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्षपद भूषवावे यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो संमतही करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा आहे. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
काँग्रेसचे अध्यक्षपद आणि युपीएचे अध्यक्षपद या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे ते कुटुंब, त्यांची वर्किंग कमिटी ठरवेल. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण यूपीए संदर्भात विरोधी पक्षाच्या नेतृत्वासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन युपीएच्या मजबूतीसाठी पुढाकार घेतला नाही, इतर पक्षांना त्यात आणलं नाही.आणि दुसरं कोणी पुढाकार घेणार असेल तर देशातले सर्व भाजपविरोधी प्रमुख पक्ष आणि मुख्यमंत्री त्यांचे नेतृत्व स्वीकारतील, असे चित्र मला सध्या दिसून येतेय. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच काँग्रेस याबाबतीत पुढाकार घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. युपीए कुणाची खासगी जहागीर नाही. आता यूपीए आहे की नाही ही शंका आहे. जर २०२४ ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावी लागेल. शरद पवार यामध्ये आघाडीवर आहेत. ते सर्व विरोधी पक्षांचे आधारस्तंभ आहेत, भीष्म पितामह आहेत. पण काँग्रेसकडून मला काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने अधिक जबाबदारीने पुढे येऊन युपीएच्या जिर्णौद्धाराचे प्रयत्न करायला हवेत. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: आज धोनीच्या अनुभवी CSKला के एलचा नवोदित LSG संघ भिडणार; जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड
“जब घटीयापन का राज हो…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
“अजित पवार हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात”, चंद्रकांत पाटलांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

