टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवार यांनी शब्द्दिक तोफ डागली आहे. पवार नवी मुंबईत बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते, अशा शब्दात पवारांनी उदयनराजें निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर ते पुढे म्हणाले, कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपला इरादा बोलून दाखवला.
तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली. तसेच खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, असं सांगत त्यांनी आगामी विधानसभेची रणनिती जाहीर केली.
दरम्यान, पुढे बोलताना म्हणाले, लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले नेते पळपुटे निघाले, असं म्हणत त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल
महाजनादेश यात्रा ही आमचं दैवत असलेल्या जनतेसाठी : फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

