Share

काँग्रेसमधील तरुण नेत्यांना भाजपमध्ये यावंसं वाटत, आम्ही त्यांना घेणार आणि सरकार बनवणार – पाटील

Published On: 

सांगली : कोरोनाचं संकट आल्यानंतर राजकीय पक्ष बदल काहीसे थंडावले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाच पक्षात घेतले. यानंतर, अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली असून काही दिवसांवर आलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकांवर मोठा परिणाम पडू शकतो. त्यामुळे राजकीय समीकरण जुळवण्यासाठी आता भाजपने देखील काँग्रेसला सुरुंग लावला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील आप्पा यांचे सुपुत्र माजी सरपंच जयराज पाटील काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, सी. बी. आप्पाही लवकरच भाजपमध्ये येतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पुणे पदवीधर मततदार संघाच्या निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी पाटील आज कामेरी येथे सी. बी. पाटील यांच्या घरी आले होते. यावेळी जयराज पाटील यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ” ‘काशीस जावे नित्य वदावे’ या उक्तीनुसार बोलत राहायचं, काशीला कधी जायला मिळेल, माहिती नाही. तसं सरकार पडणार, भाजप येणार, हे म्हणण्यात काय अडचण आहे, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्या दृष्टीने आम्ही कोणतीही पावलं टाकत नाही.’ ” असं ते म्हणाले.

तर, ‘सरकार पाडण्याच्या फंदात आम्ही पडत नाही, ती आमची संस्कृती नाही. मग तुम्ही विचाराल मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये काय घडलं? तर, काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही काय भजन मंडळी नाही, आम्ही काय कोणाला घेत नाही, असं म्हणणार नाही. आम्ही त्यांना घेणार आणि सरकार स्थापन करणार. पण महाराष्ट्रात अजून कोणी आलेलं नाही” असं सूचक विधान करून चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!