औरंगाबाद : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून, त्यांना सोबत घेऊन गेले आहेत. त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच एक घर आहे. तेथे विहंग यांना ईडीचे पथक घेऊन गेल्याचे कळते.
यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता गेल्यामुळे काहींना त्रास होतोय. त्यामुळेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचे छापे पडले. सत्तेचा गैरवापर करणं ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. असा जोरदार घणाघात शरद पवार यांनी केला आहे. तर नैराश्य माणसाला स्वस्थ बसू देत नाही. सत्ता मिळत नसल्यानं ते अस्वस्थ आहेत अस देखील शरद पवार म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका असं सुनावले. तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे सांगत या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया दिली. यावर आता भाजपकडून देखील प्रत्युत्तर येऊ लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी
- १ डिसेंबरपासून बँकांच्या नियमात होणार महत्वाचा बदल, घ्या जाणून
- महाराष्ट्रात भाजपाचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही – बाळासाहेब थोरात
- भाजपने आणखी एक घर फोडलं, कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यावर नेटकरी नाराजच, डिसलाइक्सचा नवा विक्रम होण्याची शक्यता

