पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.
मात्र, यंदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं तगडं आव्हान भाजपसमोर होतं. भाजपला रोखण्याची शक्कल या तिन्ही पक्षांनी एकत्र येत योग्य पद्धतीने राबविल्याची या निकालातून दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा पराभव जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असे पवार म्हणाले.
तसेच नागपूर आणि पुण्यातील कल पाहून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मिळून नको, एकेकटे लढा असे आव्हान दिले होते. तसेच शरद पवारांवर छोटा नेता असल्याची टीका केली होती. यावर पवारांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे, असे खोचक वक्तव्य शरद पवारांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे होतेय राष्ट्रीय पातळीवर कौतुक
- मनसेच्या रणरागिणी ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना ‘इतकी’ मतं!
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

