🕒 1 min read
पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. यासोबतच पुणे मतदारसंघात मनसेच्या ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांची उमेदवारी देखील चर्चेचा विषय ठरली होती.
त्यांची आक्रमकता, कोरोना काळातही केलेले आंदोलने यामुळे त्या चर्चेत होत्या. मनसेने त्यांना पदवीधर विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी तब्बल ६ हजार ७१३ मतं पटकावून तिसऱ्या स्थान पटकावलं आहे. त्यांना प्रभाव पत्करावा लागला असून राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवून भाजपच्या गडाला खिंडार पाडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने घेतला ‘हा’ निर्णय !
अखेर ठरलं : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे आणि कधी होणार ?
ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं – फडणवीस
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं
- राष्ट्रवादीला घाम फोडणार अशी चर्चा असलेले श्रीमंत कोकाटे यांना अवघी ‘इतकी’ मते


