🕒 1 min read
लातूर : केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं काल शेतकऱ्यांसोबत चौथ्या टप्प्यातली चर्चा केली, आणखी काही मुद्यांवर पुढे चर्चा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर हिंगोली शहरामध्ये महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.नगर,लातूर ,धुळे, जळगाव, बुलडाणा, नाशिक, मुंबई इथंही आंदोलन करण्यात आलं.
भाजप सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अकोला शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/mSwMNlE7iZ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 3, 2020
दरम्यान, शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल पुन्हा दिली. नवीन कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची चौथी फेरी काल नवी दिल्लीत झाली,त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
या चर्चेत केंद्र सरकारच्या वतीनं तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते. आजची चर्चा चांगल्या वातावरणात झाली आणि चर्चेची पुढची फेरी येत्या ५ तारखेला शनिवारी होईल, असं तोमर यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
-
‘तुला थोडी तरी लाज वाटायला हवी….,’ दिलजीतनंतर मिका सिंगने कंगनावर डागली टीकेची तोफ
-
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
-
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
-
‘हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक’
- ‘शेतकरी,कष्टकरी,कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
