Share

Sharad Pawar : “…तर मी नवीन सरकारचे अभिनंदन केले असते”, शरद पवारांचे वक्तव्य

Published On: 

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत टीका केली. मागील १०-१२ दिवस राज्यात दोनजण सरकार चालवत आहेत आणि मंत्रिमंडळाची निर्मिती अद्याप झालेली नाही. इतके दिवस लागणे हे योग्य नसल्याचे शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटले आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि अन्य प्रश्न लोकांपुढे असताना त्याबाबत निर्णय घेऊन कामाची जबाबदारी घेणारी जी मंत्रिमंडळाची यंत्रणा आहे तीच राज्यात नाही. त्याला विलंब लागत असेल तर हे राज्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत नुकसानकारक आहे. नवीन सरकार आल्यानंतर नवीन काही केले असते तर त्यांचे मी अभिनंदन केले असते. परंतु पूर्वीच्या सरकारने घेतलेले एक-एक निर्णय रद्द करणे, यावरच आपण फार मोठं काम करतोय असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, जो राज्याच्या दृष्टीने चांगला नाही. असा टोला शरद पवारांनी लगावला.

दरम्यान यावेळी शरद पवारांनी केंद्रावरही निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. केंद्र सरकारची जबाबदारी आहे की देशाची अर्थव्यवस्था नीट कशी राहील हे पाहणे. त्या दृष्टीने योग्य पावले टाकली नाहीत ही विरोधकांची तक्रार होती. रुपयाची होणारी घसरण पाहता विरोधकांची तक्रार योग्य होती. हा विषय संसदेमध्ये आम्ही आग्रहाने मांडणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!