Share

खराब कामगिरीच्या दबावामुळे ‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूंनी केली होती अचानक निवृत्तीची घोषणा; वाचा!

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या खराब फॉर्मची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याला धावा काढण्यात सतत अपयशाचा सामना करावा लागत आहे. एकेकाळी शतकावर शतक झळकावणाऱ्या या फलंदाजाला गेल्या ३ वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असेही काही दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना खराब कामगिरीमुळे निवृत्तीची घोषणा करावी लागली.

वीरेंद्र सेहवाग

क्रिकेटच्या इतिहासातील स्फोटक सलामीवीरांमध्ये भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले जाते. आपल्या आक्रमक फलंदाजीने कसोटी क्रिकेटला कलाटणी देणाऱ्या या खेळाडूने सुरुवातीच्या दिवसांत जबरदस्त धावा केल्या. भारतासाठी त्रिशतक झळकावण्याची किमयाही या खेळाडूने प्रथमच साधली. पण खराब फॉर्मने सेहवागला चांगलेच पकडले आणि अखेरीस त्याला क्रिकेटमधुन निवृत्ती घ्यावी लागली. २०११ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावल्यानंतर शेहवागची कारकीर्द उतरणीला लागली. २०१२-१३ मध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे त्याची निवृत्तीकडे वाटचाल सुरू झाली. २०१० मध्ये त्याच्या बॅटने कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतरच्या काळात त्याला ४० डावात फक्त एकदाच शतक झळकावता आले. अखेर संघाबाहेर असताना त्याने २०१५ मध्ये निवृत्ती स्वीकारली.

दिलीप वेंगसरकर

केवळ भारतच नाही तर जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणारा मुंबईचा फलंदाज दिपिल वेंगसरकरलाही खराब फॉर्ममुळे आपली कारकीर्द संपवावी लागली. १९८० च्या दशकात जगभरात गाजलेल्या या फलंदाजाचा खेळ १९८८ ते १९९२ या काळात अतिशय वाईट टप्प्यातून गेला. या काळात त्याला १८ कसोटी सामने खेळल्यानंतर एकही शतक झळकावता आले नाही. कारकिर्दीतील सरासरी ४२ असलेल्या वेंगसरकरने या काळात फक्त २२ च्या सरासरीने धावा केल्या. १९९१-९२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने ५ कसोटी सामन्यांमध्ये १७ धावांची सरासरीने धावा केल्या. त्यामुळे हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा दौरा ठरला.

राहुल द्रविड

कसोटी क्रिकेटमध्ये द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड हा जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये गणला जातो. १६४ कसोटी सामने खेळल्यानंतर द्रविडने ३६ शतकांच्या जोरावर १३२८८ धावा केल्या. परंतु शेवटी काही सामन्यांमध्ये खराब फॉर्ममुळे त्याची कारकीर्द संपुष्टात आली. २०१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धावा काढण्यात अपयशी ठरल्यानंतर द्रविडने अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याला शेवटच्या १० कसोटी डावांमध्ये मोठी धावसंख्या करता आली नाही. या काळात द्रविडची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती, त्यामुळे द्रविडने निवृत्तीचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!