Share

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणतोय,“युझवेंद्र चहल टी-२० विश्वचषकात भारतासाठी…”

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने भारताचा स्टार फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहलबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हॉगच्या मते, भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल. चहलच्या चांगल्या कामगिरीचेही हॉगने कौतुक केले. चहल पुढील आठवड्यात ३२ वर्षांचा होईल. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान संघातून त्याला वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये २० सामने खेळले आहेत आणि २६ बळी घेतले आहेत.

ब्रॅड हॉग म्हणाला की, “गेल्या दोन वर्षांतील चहलची कामगिरी पाहता तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात आणखी चांगली कामगिरी करेल असे दिसते. चहलने एक खेळाडू म्हणून त्याच्या कौशल्यात खूप सुधारना केली आहे. यामुळेच या विश्वचषकासाठी भारत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियासाठी १२३ एकदिवसीय सामने खेळलेला फिरकीपटू हॉग ला विश्वास आहे की, चहल आगामी टी-२० विश्वचषकात डावातील मधल्या षटकांमध्ये विरोधी संघावर वर्चस्व गाजवू शकतो.” हॉग पुढे म्हणाला की, ‘मला वाटते की टी-२० क्रिकेटमध्ये विशेषतः मधल्या षटकांमध्ये लेग-स्पिन हा सर्वात प्रभावी पर्याय आहे. मला चहलबद्दल एक गोष्ट आवडते ती म्हणजे तो त्याच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी कधीही तयार असतो.’

सूर्यकुमार यादवने अलीकडेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५५ चेंडूत ११७ धावा करून जागतिक क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. हॉगला वाटते की, सूर्यकुमारकडे भरपुर कौशल्य आहे त्यामुळे तो विरोधी धोकादायक फलंदाज ठरू शकतो. हॉग पुढे म्हणाला की, ‘सूर्यकुमार फलंदाजीत लवकरच वर्चस्व निर्माण करेल. तो एक प्रतिभावान फलंदाज आहे. मैदानात तो वेगवेगळ्या क्षेत्रात धावा करत असल्याने त्याला गोलंदाजी करणे अवघड आहे. जर तो आणि ऋषभ पंत क्रीजवर असतील तर त्यांना बाद करण्याचे नियोजन करणे खूप कठीण आहे.’

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!