Share

Devendra Fadnavis : “ज्यांनी फुटकी कवडी दिली नाही, त्यांना पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा…”, फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या. सत्ता स्थापनेनंतर शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र यावरूनच राजकीय क्षेत्रातून अनेक टीका-टिपण्णी करण्यात आली. यालाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही, त्यांना पेट्रोल-डिझेल दरकपातीवर बोलण्याचा अधिकार तरी आहे का? आम्ही दर कमी केले आहेत आणि गरज पडली तर आणखी निर्णय घेऊ.”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

तसेच ज्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे नाही, ते आता बुद्धीभेद करीत आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणात अडथळे आणण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता त्यावर आक्षेप घेत आहेत. यासंदर्भात अन्य कुठलाही अभ्यास करायचा असेल तर आमचे सरकार त्यासाठी तयार आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
▪ राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
▪ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
▪ राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
▪ अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
▪ बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
▪ आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!