पुणे : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. काल अर्णब यांच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने दिलासा न देता न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अलिबाग सत्र न्यायालयात जामीनासाठी पुन्हा याचिका दाखल करण्यास सांगितले.
अर्णब यांच्या जामीनावरून काल(सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. काल देखील अन्वय नाईक प्रकरणातील तिन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हे प्रकरण न्यायालयीन कोठडीचं असून उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. ज्या न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे त्या अलिबाग सत्र न्यायालयात यावर पुन्हा याचिका करावी असं कोर्टाने सांगितलं आहे. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
यानंतर, अर्णब गोस्वामींचा तळोजा कारागृहातील मुक्काम वाढला असून त्याच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. तर, खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट फोन करून अर्णबची चिंता व्यक्त केली होती. आता, खासदार शरद पवारांनी यावरुन राज्यपालांना टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले की, “राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं” असे पवार म्हणाले .
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल
- तेजस्वीच्या सभेसारखी गर्दी आपल्याकडे राज ठाकरेंच्या सभेला होती पण सत्ता येत नाही – तावडे
- अमेरिकेच्या निवडणुकीत आलेला लोकशाहीचा कौल डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारावा; आठवलेंचा सल्ला
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय
- नाटक सुरु करावीत; नाटकक्षेत्राने गाठला राज ठाकरेंचा दरबार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
