Share

कट्टर विरोधक एकाच मंचावर येणार; राजकीय वर्तुळात चर्चांना आलं उधाण

Published On: 

अहमदनगर – राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाद सर्वश्रुत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते कधीच सोडत नाहीत. मात्र आता राजकारणातील हेच कट्टर विरोधक एकाच मंचावर येणार आहेत. शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवारी ऑक्टोबरला नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे आणि शरद पवार एकच मंचावर येणार असल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चांना उधाण आलं आहे.

नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी मोठा निधी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे.या कामांचे भूमिपूजन होणार आहे.

अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!