अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पारनेर, नगर, राहुरी तालुक्यातील जमिनीचे के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नाही. बाधित गावांचेही विस्थापन होणार नाही. मात्र, लष्कराचा सराव या ठिकाणी सुरूच राहील. जनतेने घाबरून जाऊ नये. त्यामुळे भूसंपादन होऊन गावे विस्थापित होण्याच्या भीतीने घाबरू नका, असे आवाहन पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. नगर येथे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत तहसीलदार देवरे यांची बैठक झाली त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाल्याचे देवरे यांनी पत्रकारांना सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. यात बागायती जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याविरोधात सर्व गावकरी एकवटले आहेत. पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील तेवीस गावे हे के.के.रेंज अधिग्रहण कक्षात येत असल्याने सदर गावांतील नागरिकांचे जनजिवन अस्थिर झाले आहे. मात्र के.के.रेंजसाठी भूसंपादन होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. त्यावरून मोठे राजकारण तापले. श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती.
दरम्यान, देवरे यांनी भूसंपादन होणार नसल्याचे सांगितल्याने या भागातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. यासंदर्भात काल लष्कराचे अधिकारी कर्नल जी.आर.कानन व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यात याप्रश्नी बैठक झाली. यावेळी बोलताना कर्नल म्हणाले की, बाधित गावांचे विस्थापन करून भूसंपादन होणार नाही. मध्यंतरी या भागाची पाहणी करण्यासाठी लष्कर आले होते. सन १९६९ पासून दरवर्षी पाच वर्षांसाठी नव्याने नोटिफिकेशन निघत असते. जानेवारी २०२१ या वर्षीही ते निघणार आहे, २०२६ पर्यंत सदर नोटिफिकेशन असणार आहे. त्यामुळे याबाबतीत बाधित गावातील जनतेने घाबरून जाऊ नये असा निर्वाळाही कर्नल जी.आर.कानन यांनी दिल्याचेही तहसीलदार देवरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे
- नाथाभाऊंनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही; चंद्रकांत पाटलांची भावनिक साद
- ‘प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल अनुद्गार काढणे योग्य नाही’
- महाराष्ट्राने उदयनराजेंचा अपमान सहन केला याचं आश्चर्य वाटतं : निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

