🕒 1 min read
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर बोचरी टीका केली असून आता यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांसह मराठा नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील काल प्रकाश आंबेडकर यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दात ट्विट करून टीका केली होती. मात्र ते ट्विट त्यांनी डिलीट केलं असून त्यामागील कारण देखील सांगितलं आहे. “प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला ह्या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटलं. घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी, पण वैतागून कालचं माझं ट्विट डिलिट केलं कारण इतरांना काहीच घेणं देणं नाही राहीलं.” असं ट्विट आज केलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला ह्या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटलं. घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी, पण वैतागून कालचं माझं ट्विट डिलिट केलं कारण इतरांना काहीच घेणं देणं नाही राहीलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 9, 2020
प्रकाश आंबेडकरांची उदयनराजेंवर जहरी टीका
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचेच आरक्षण रद्द करून फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे म्हणजे गरिबांवर अन्याय होणार नाही असं वक्तव्य केलं होत. यावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे
- अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- पियुष गोयल
- भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला
- सोलापुरात एम आय एम-शिवसेनेला राष्ट्रवादी पाडणार भगदाड ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
