Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासह उद्या, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.

मराठा संघटनांच्या वतीने सुरेश पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून 1 महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. याशिवाय MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही चर्चा सकारात्मक झाल्याचं सुरेश पाटील यांMPSC परीक्षा पुढे ढकलण्याची चर्चा सकारात्मक झाल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं.

सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली. महिन्याभरात आम्ही दोन्ही प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन सरकारकडून मिळाल्यामुळे आम्ही तात्पुरता बंद मागे घेत असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान,शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यास सरकार अनुकूल असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि दलित महासंघाकडून वेळेवर परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!