मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागामार्फत गट क आणि ड संवर्गातील विविध पदांकरीता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षात मोठा गोंधळ झाला. याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली असून राज्य सरकारला तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले, प्रत्येक बाबतीत न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार… अशी टीका भातखळकरांनी राज्य सरकारवर केली आहे.
प्रत्येक बाबतीत न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार… pic.twitter.com/Cn9SOUMzOH
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2021
न्यासा कंपनीमार्फत गट क पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रश्नपत्रिका चुकीच्या दिल्या तसेच गट ड च्या प्रश्नपत्रिका या गट क साठी वितरीत केल्याने त्या परीक्षेपूर्वीच फुटल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला होता.
त्यामुळे या विरोधात एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर व इतर उमेदवारांनी अॅड. विशाल कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी न्यायधिश एस.व्ही. गंगापूरवाला व आर एन लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात त्यांनी राज्य सरकारला नोटीस काढली असून तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai: महापौरांच्या दालनातून फायली गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघड
- सारा अली खानने बॉडीगार्डला सुनावले; कारण वाचून कराल कौतुक
- खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संसद भवन परिसरात विरोधकांची निदर्शने
- नितेश राणेंनी ठाकरेंना पाठवले पत्र; म्हणाले, फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचे श्रेय….
- निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना माफी मागणार? प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

