सातारा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सरडे येथील घराची दुरुस्ती करू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी प्रवीणच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून देण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर प्रवीणच्या आईने त्याला ही माहिती दिली. गरीब कुटुंबातून येऊन देशपातळीवर देशाचे नाव झळकावणाऱ्या प्रवीण जाधवच्या कुटुंबियांवर अशी वेळ आल्याने हे कुटुंब बारामतीला कायमच स्थाईक होण्याच्या तयारीत आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालूक्यातील सरडे या गावात राहणारे हे पती पत्नी आहेत. झोपडीत राहणाऱ्या संगिता आणि रमेश जाधव या दाम्पत्याचा मुलगा म्हणजेच प्रविण जाधव. याच दगड मातीत खेळता खेळता त्याने खेळामध्ये मोठे नावलौकिक मिळवलं की, चक्क संपुर्ण देशाच लक्ष प्रविणकडे गेले. टोकियो ऑलिम्पिक पर्यंतची मजल मारली खरी मात्र इकडे या कुटुंबाच जेसीबीने घरच उद्ध्वस्त करण्याची धमकी काही गावगुंडांनी दिली.
प्रविणने सांगितले की, आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, परंतु शेजाऱ्यांचा त्याला विरोध आहे. सकाळी पाच सहा जण आले आणि त्यांनी वडीलांना व काकांना धमकी दिली. यापूर्वीही त्यांनी असाच त्रास दिला होता. त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे. ज्यावर आम्ही होकार दिला होता. पण आता त्यांनी मर्यादा सोडली. या घरात अनेक वर्षांपासून आम्ही राहत आहोत, आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत.
घरी आई-वडील, चुलती व चुलतभाऊ असे ४ जणांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये राहते. स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना ८४ गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिले. त्याठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाचा विरोध आहे. या विरोधातून दोन दिवसापूर्वी दोन्ही कुटुंबात वाद झाला. शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असं सांगून बांधकामात अडथळा आणत आहेत. शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने प्रविण जाधवचे दोन खोल्यांचे घर जेसीबीने पाडू अशी धमकी त्यांना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रेकिंग : मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102 व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार करणार बदल
- ‘संसदेत आलात तर, मी टक्कल करेल’; देरेक ओब्रायन यांचे अमित शहांना आव्हान
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप
- अकलूज नगरपरिषदेची अधिसूचना निघताच नागरिकांनी केली फटाक्यांची आतषबाजी


