🕒 1 min read
मुंबई : आगमी टी-२० विश्वचषकाची तयारीसाठी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बांग्लादेशने दिलेल्या १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ अवघ्या ६२ धावांवर अटोपला. यासह बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे.
नाणेफेक जिंकत अखेरच्या षटकात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकात बांग्लादेशने ८ गडी गमावत १२२ धावांची मजल मारली. बांग्लादेशकडून या डावात सलामीवीर मोहम्मद नईमने २३ चेंडुत १ चौकार आणि १ षटकारांसह सर्वाधीक २३ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन इलीस आणि डॅनियन ख्रिस्टियन दोघांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
Bangladesh win the #BANvAUS T20I series 4-1!
Shakib Al Hasan-led attack bowled Australia out for 62, guiding their side to a 60-run win ????
Scorecard: https://t.co/ap9nHpzYec pic.twitter.com/7WyjAmgiOv
— ICC (@ICC) August 9, 2021
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने बांग्लादेशच्या गोलंदाजीसमोर अक्षरश: लोटागंण घातले. बांग्लादेशच्या १२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बलाढ्य कांगारुचा डाव अवघ्या १३.४ षटकात ६२ धावांवर अटोपला. यासह बांग्लादेशने हा सामना ६६ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यु वेडने २२ चेंडुत २ षटकारासंह २२ धावांची मजल मारली. त्याच्याव्यतिरिक्त बेन मॅकडरमॉट(१७) वगळता इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या ओलाडूं शकला नाही. बांग्लादेशकडून शकिब अल हसनने ९ धावात सर्वाधीक ४ गडी बाद केले. त्यालाच सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
