Share

केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच आरक्षणाचा मुद्दा सुटू शकेल – शाहू महाराज

Published On: 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडत आहेत. यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. असा थेट आरोप शाहू महाराज यांनी केला आहे. तर नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भेट घेतली या भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती शाहू महाराज यांनी याप्रसंगी बोलताना दिली आहे.

मराठा समाजाचा हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय काही होणार नाही. असं देखील शाहू महाराज म्हणाले आहेत. दरम्यान, मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे. केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं असे आवाहन देखील शाहू महाराज यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!