🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. बऱ्यादा अंकिता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. तिच्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्स देखील मिळतात. नुकतेच अंकिताने तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडीयावर शेअर केली आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, ‘डिअर विक्की, तु माझ्यासोबत तेव्हा होतास जेव्हा मी संकटात होते. तु प्रत्येक वेळी माझी चिंता करत होतास आणि मी प्रत्येक वेळी म्हणत आले की ‘मी ठीक आहे’. कारण मला माहित आहे की तु माझ्यासोबत आहेस. मला तुझे आभार मानायचे आहेत. कारण तु जगातला सर्वात बेस्ट बॉयफ्रेंड आहेस. मला काय हवंय हे तुला सांगायची कधी गरज पडत नाही. तुला नेहमीच न बोलता कळतं ते…तुझे खरंच खूप आभार. मला प्रत्येक वेळी एका राणीप्रमाणे ठेवल. कितीही महत्त्वाचं काम असलं तरी माझ्यासाठी वेळ काढतोस. माझ्या कुटुंबीयांसोबत नातं तयार केल’.
https://www.instagram.com/p/CQI8Jb0L5L3/?utm_source=ig_web_copy_link
पुढे अंकिता म्हणाली, ‘माझ्यासाठी या सगळ्या लहान देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण दोघांनीही आयुष्यात भरपूर चढ-उतार पाहिले आहेत. तु मला विश्वास दिला होतास की एक दिवस सगळं काही सुरळीत होईल. तु नेहमीच दिलेला शब्द पूर्ण केलास आणि आज माझ्यासोबत आहे. या सगळ्या कारणांसाठी मी तुझी कायम आभारी असणार आहे. मी पहिल्यापेक्षा आणखी जास्त तुझ्या प्रेमात पडले आहे,’ अशी एक पोस्ट लिहित अंकिताने विक्की बाबत तिचे प्रेम व्यक्त केले आहे.
तर पुढे ती म्हणते की, ‘मला कधीच प्रेम आणि आनंद मिळणार नाही हा विचार करून माझं मन तुटत होतं. गेल्या काही वर्षात मी बऱ्याच अडचणीतून गेले. मग एक दिवस मी तुला भेटले, तु मला विश्वास दिला. आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मग पहिल्यासारखं कधीच राहीलो नाही. तुझे खूप आभार माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला जगातली सर्वात नशीबवान मुलगी तू ठरवले. त्या प्रेमाचे खूप आभार, ज्यामुळे मी एक उत्तम व्यक्ती बनण्यासाठी मदत केली.
या पोस्टच्या शेवटी अंकिताने लिहिले की, विक्की, तुला माझा सलाम, मी तुला वचन देते की जगातलं सगळं सुख तुला देत राहील. ज्या पद्धतीने तु परिस्थितीशी सामना केलास, तो प्रत्येक जण करू शकत नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप आभार…विक्की जैन, आदर आणि प्रेम कायम तुझ्यासाठी राहील’. अशी एक भलीमोठी पोस्ट तिने केली आहे. अंकिता गेल्या तीन वर्षांपासून विकी जैन सोबत रिलेशनमध्ये आहे. अंकिताने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता आणि आता ती लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील सध्या होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
