Share

भाजप-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता नरेंद्र मोदी पुन्हा जाणार पश्चिम बंगालमध्ये

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. या सत्तेला भाजपनं मोठं आव्हान निर्माण केलं असतानाच असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं. त्यामुळे ममता बॅनर्जींसमोरील आव्हान आणखीच तीव्र झालं.

२३ जानेवारी रोजी व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देखील, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणाबाजीमुळे चांगल्याच भडकल्या होत्या. तेव्हा त्यांनी भाषण करण्यास नकार देत, जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.

हा वाद ताजा असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांना 7 फेब्रुवारी 2021 रोजी भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4:50 वाजता पश्चिम बंगालमधील हल्दीया येथे काही पायाभूत सुविधांचे राष्ट्रार्पण करतील तसेच कोनशिला बसवतील. पंतप्रधान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बांधण्यात आलेले एलपीजी इम्पोर्ट टर्मिनल राष्ट्राला अर्पण करणार आहेत. तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा शुक्रवारी रात्री कोलकाता येथे पोहोचले आहेत. येत्या पश्चिम बंगालमध्ये  होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला जनतेचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने ते राज्यात ‘रथयात्रा’ काढणार आहेत.

बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार मुकाबला होईल, असे सध्याचे चित्र आहे. अर्थात, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्यांची आघाडीही मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिवसेना,आणि ओवेसी यांची पार्टी देखील आगामी निवडणुकीत उतरणार असल्याने ममता यांची अडचणी वाढल्या आहेत यातच आता अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत अश्या परिस्थितीत मोदी बंगालमध्ये जात असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!