🕒 1 min read
मुंबई :शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी सोशल मीडिया वरुन सतत आपल्या फॅन्सची गप्पा मारत असतो. यावेळी शाहरुखच्या ट्विटर हँडलवर # आस्क SRK या सेशनमध्ये चाहते त्याला प्रश्न विचारत असतात. यामध्ये एका फॅनने शाहरुखला असा प्रश्न विचारला की, किंग खानदेखील चक्रावून गेला. वसीम नावाच्या एका नेटकऱ्याने चक्क ‘तुझा मन्नत बंगला विकणार आहेस का?’ असा प्रश्न विचारला.
आता शाहरुख खानचा मन्नत बंगला म्हणजे नावाप्रमाणेच त्याची एक मोठी मन्नत आहे. हे सर्वानाच माहित आहे. त्यामुळे या फॅनने असा प्रश्न विचारल्याने शाहरुखने त्या फॅनची चांगलीच शाळा घेतली. शाहरुख म्हणाला, ‘मन्नत ही विकली जात नसते तर ती डोकं टेकवून मागावी लागते.’ शाहरुखचे हे उत्तर इतर चाहत्यांना खूपच भावले त्यामुळे शाहरुखच्या या उत्तरावर आणि लाइक्स आणि शेअर्सचा देखील वाढल्याचे दिसून आले. शाहरुखचा बंगला मुंबईतल्या आयकॉनिक इमारतींमधला एक बंगला आहे. बांद्र्यामध्ये समुद्राजवळ असलेला मन्नत बंगला विकत घेण्यासाठी बॉलिवूडच्या या बादशाहाने खूप मेहनत केली आहे. शाहरुखचे अनेक फॅन्स फक्त त्याचा बंगला बघण्यासाठी संपूर्ण देशभरातून बांद्र्याला येतात.
Bhai Mannat bikti nahi sar jhuka kar maangi jaati hai….yaad rakhoge toh life mein kuch paa sakogay. https://t.co/dh3gJTVnOu
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 27, 2020
शाहरुख खान लवकरच पठाण सिनेमाच्या शूटला सुरुवात करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील झळकणार आहेत. याशिवाय आणखी 2 प्रोजेक्टवर शाहरुखचं काम सुरू आहे. जरा सा झूम लू मैं हे गाणं वीणाने जसंच्या तसं रिक्रिएट केलं आहे. मुळ गाण्यासारखेच कपडे, गाण्यात आहेत तशाच स्टेप्स वीणाच्या व्हिडीओमध्येही आहेत. हा व्हिडीओ शाहरुख खानलाही खूप आवडला आहे. शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्यांचे आभारही मानले आहेत. पाहुयात त्या व्हिडीओची एक झलक दरम्यान झीरो या चित्रपटानंतर शाहरुखने 2 वर्षाचा ब्रेक घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : तातडीने घटनापीठ स्थापन करा! सरकारची मुख्य न्यायमुर्तींना दुसऱ्यांदा विनंती
- नगरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजा व खसखसची शेती करू द्या!
- १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू; भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- ‘लक्ष्मी बॉम’ आणखी एका वादाच्या विळख्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
