Share

Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील एका डायलॉगने देशभर गाजले. मात्र जेव्हापासून ते गुवाहाटीवरून परत आलेत. तेव्हापासून ते संजय राऊत आणि राष्ट्रवादीला सतत टार्गेट करत आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेचे आमदारांना निधी मिळू दिला नाही. सर्व निधी हा राष्ट्रवादीच्याच आमदारांना दिला, असा आरोप जवळपास सर्वात बंडखोर आमदार करत आहेत. शहाजीबापू पाटील यांनीही याच बंडखोरांच्या सुरात सूर मिसळला आहे. आज पुरंदरमध्ये तर शहाजीबापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग केलीय. यावेळी राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली. मात्र आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही.

आम्हीही ठोका देणारच असे म्हणत शहाजीबापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीला धुतलंय. आजच्या पुरंदरच्या सभेत ते बोलत होते. या सभेत इतरही बडे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना शाहाजीबापू पाटील म्हणाले, आज आपल्या नव्या भूमिकेत आपले मुख्यमंत्री आले आहेत. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद हवा आहे. जे महाराष्ट्रात राजकारण झालं, त्याला कुणी गद्दार म्हटलं कुणी काय म्हटलं, मात्र क्रांती घडवली आहे. निवडणुका झाल्यानंतर आम्हाला वाटलं भाजप सेना युतीचे सरकार येणार अस वाटलं होतं. मात्र तुम्ही आम्हाला फरफटत नेलं आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, मात्र असू द्या तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ठाकरे घराण्यात मुख्यमंत्री पद मिळालं, तुमचा पाया पडतो आम्ही 40 आमदार शिंदे साहेबांना घेऊन गेलो, ते नाही आम्हाला घेऊन गेले, असेही यावेळी शाहाजीबापू पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय. आमची काम होत नसतील, तरआपण काम कुठे करायचं? कर्नाटकात जाऊन? असाही सवाल यावेळी बापुंनी केलाय. तर राष्ट्रवादीने तिजोरी गिळून टाकली, असा आरोपही त्यानी केला आहे. तसेच अंतकरणापासून सांगतो कुठलं नेतृत्व पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. आम्हीही मेलेल्या आईच दूध पिलो नाही, आम्ही पण ठोका देणार, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे. तर एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. एक एक करून आमदार गेलेत, शिंदे साहेब कधी गेलेत एकालाही कळलं नाही, तुमचं सीआयडी खातं काय करत होतं? असा सवालही त्यांनी गेल्या सरकारला केला आहे. तर आम्ही जे केलं शिवसेना वाचवण्यासाठी केलं, बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कुठला मुख्यमंत्री लाभला असेल तर ते एकनाथ शिंदे असे म्हणत त्यांनी शिंदेंचं कौतुक केलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!