Share

Shahajibapu patil | “२२ वर्ष ते काम करतायेत अन् आमचं बघा…”; शहाजीबापूंचा ठाकरेंना टोला अन् पवारांचे कौतुक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे देखील सभा घेत आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. अशीच एक सभा आज सासवड भागात सुरु आहे. या सभेत सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जबरदस्त डायलॉगबाजी करत त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर टीका केली. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत असताना मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मात्र त्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

शहाजीबापू पाटील म्हणाले, “अहो शरद पवारांना कॅन्सरचा आजार आहे. जगात कॅन्सर एवढा मोठा आजार नाही. २२ वर्ष ते काम करतायेत. रोज सकाळी साडेपाचला उठत्यात, अंघोळ करत्यात, पांढरा रुमाल तोंडाला लावत्यात आणि कामाला लागत्यात”, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. तर दुसरीकडे ते असेही म्हणाले कि, “अन् आमचं बघा, आजारपण असतंय ओ, भंगवंतानी दुर्दैवाने तुम्हाला ते दिलं. पण तुम्ही काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती. एकनाथ शिंदेंना इन चार्ज कार्याला पाहिजे होतं. ते घरात बसले अन् अजित दादाच आरडत ओरडत हिंडायला लागले. आम्ही टीव्हीला बघत होतो आमचा नेता कुठंय? पण आमचा नेता कुठंच नव्हता. सगळीकडं अजित दादाच होतं.”, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

बंडा दरम्यानचा किस्सा
शहाजीबापू पाटील म्हणाले कि, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सिल्वर ओकवर होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे अनेक मोठे नेते मुंबईत हजर होते. सगळी पोलीस यंत्रणाही त्या ठिकाणी उपस्थित होती. मात्र आमचे ४० आमदार एक एक करत कधी ठाण्याकडे रवाना झाले हे कुणालाही समजलं नाही. असली यांची यंत्रणा आहे. पेंगत झोपत बसली होती. अन् आम्ही सुरतला पोहचल्यावर हे म्हणायला लागले कि हे कुठं गेले ते बघा. शहाजीबापू पाटील यांचा फोन नॉट रिचेबल. शहाजीबापू फोन वर सापडत नाही. मी माझा बायकोला महिना महिना फोन वर सापडत नाही आणि तुम्हाला कुठं सापडायचो, येड्या का हुडकाय लागलाय, असा टोला शहाजीबापू पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!