Share

Ajit Pawar | सत्कार स्विकारण्यारपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा – अजित पवार

Published On: 

मुंबई : विदर्भ-मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र देणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. उद्या कॅबिनेटची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे. असा खोचक टोलाही अजित पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावला.

विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती अजित पवार यांनी आज माध्यमांना दिली. अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. हे सांगतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्रसरकारला अद्याप कळवले नाही, त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करण्यास आली नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!